इयत्ता ८ वी मराठी पाठ ६ – आभाळाची आम्ही लेकरे प्रश्नोत्तरे | Maharashtra Board Class 8 Marathi

“आभाळाची आम्ही लेकरे” ही वसंत बापट यांची प्रेरणादायी कविता आहे. या कवितेत कष्टकरी आणि शेतकरी वर्गाचे जीवन, त्यांचे श्रम, आपुलकीचे नाते आणि एकतेची भावना सुंदरपणे व्यक्त केली आहे. शेतकरी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून स्वतःचे भविष्य घडवतात. जात-पात, भेदभाव यांचा विचार न करता एकजुटीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा संदेश या कवितेतून मिळतो.

या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव, श्रमाचे महत्त्व, एकता, समानता आणि स्वावलंबन यांसारखी मूल्ये समजतात. खाली या कवितेवरील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे, समानार्थी शब्द आणि यमक शब्द दिले आहेत.

प्रश्न १.

“आभाळाची लेकरे” ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे?

उत्तर:
“आभाळाची आम्ही लेकरे” ही कविता “शिंग फुंकिले रणी” या काव्यसंग्रहातून घेतली आहे.

प्रश्न २.

काळी माती म्हणजे कोण?

उत्तर:
काळी माती म्हणजे धरती, शेती.

प्रश्न ३.

शेतकरी कुठे राहतात?

उत्तर:
शेतकरी श्रमगंगेच्या तीरावर व कष्टकऱ्यांच्या वस्तींत राहतात.

प्रश्न ४.

शेतकऱ्यांचे काय ध्येय आहे?

उत्तर:
कोणताही भेदभाव न ठेवता, वेगळा रस्ता न स्वीकारता, एकच काम करणे हे शेतकऱ्यांचे ध्येय आहे.

प्रश्न ५.

शेतकऱ्यांमध्ये कोणते नाते आहे?

उत्तर:
शेतकऱ्यांमध्ये आपुलकीचे नाते आहे.

प्रश्न ६.

शेतकरी काम करताना कोणता विचार करतात?

उत्तर:
शेतकरी म्हणतात की, आम्ही मेहनत करून आमचेच आमचे भाग्य घडवणार. आमचा देव एकच. आमची कोणतीच जात श्रेष्ठ नाही. पण एकच उद्देश आहे की, सर्वांनी मिळून, जातिपात न विचारात घेता, खूप मेहनत करून शेतात घाम गाळून काम करणे.

प्रश्न ७. समानार्थी शब्द लिहा.

१. आभाळ — आकाश
२. काळी माती — धरती
३. आई — माता
४. श्रम — मेहनत
५. बाहू — हात

प्रश्न ८. यमक शब्द लिहा.

१. तीरावरती — वसती
२. नाते — विधाते
३. ठावे — करावे
४. बाहू — नेऊ